Amravati Violence | माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – मागील तीन दिवसातील घडामोडीनंतर अमरावती शहरात तणावपूर्ण (Amravati Violence) वातावरण आहे. पोलिसांनी अमरावती शहरात (Amravati Violence) कोबिंग ऑपरेशन (Cobbing operation) सुरु केले आहे. शनिवारी व रविवारी हिंसक घटना घडवून आणणाऱ्यांवर कारवाईचे सत्रु सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत 11 हजार गुन्हे (FIR) दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईत माजी मंत्री व भाजप नेते (BJP leader) अनिल बोंडे (Anil Bonde), भाजपचे आमदार प्रवीण पोटे (BJP MLA Praveen Pote), महापौर चेतन गावंडे (Mayor Chetan Gawande), भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, मनपा गटनेता मनोज भारतीय यांचा गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे.

 

शनिवारी अमरावती (Amravati Violence) बंदची हाक देणारे माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे यांच्यासह भाजप व हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात शहर कोतवाली पोलिसांनी (City Kotwali Police) विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता राजकमल चौकात केलेल्या निदर्शनामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

भाजपने पुकारलेल्या बंद दरम्यान, शनिवारी दुपारी तीन नंतर टांगापाडाव चौकापुढे सक्कारसाथ, चांदणी चौक भागात धुमश्चक्री उडाली. दोन तास थरार चालला. परिणामी, संचारबंदी लागू करुन इंटरनेट बंदी करण्यात आली. तर रविवारी पेट्रोल बंदी करण्यात आली. सलग दोन दिवस शहरात हिंसक घटना घडल्याने अमरावतीत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, रविवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती मात्र संचारबंदी अद्याप उठविण्यात आलेली नाही.

 

Web Title :- Amravati Violence | former minister anil bonde pravin pote and other bjp leaders arrested amravati riot incident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा