Amravati Violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद अमरावतीमध्ये, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – त्रिपुरा येथील हिंसाचाराचे (Tripura Violence) पडसाद अमरावती (Amravati Violence) मध्ये उमटले आहे. त्रिपुरातील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये (Amravati Violence) करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शहरातील दुकाने बंद करण्यावरुन दगडफेक करण्यात आली होती. आज (शनिवार) बंद घोषित केल्यानंतर देखील चांगलेच वादंग निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अमरावती शहरामध्ये संचारबंदी (Curfew) आदेश लागू करण्यात आले आहेत. आता तीन दिवस इंटरनेट सेवा बंद (internet service off) करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय.
त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर अमरावतीत या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी (Amravati Violence) शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या संघटनांनी (Muslim community organization) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Agitation) केले. त्यानंतर शहराच्या काही भागांत दगडफेक झाली. यामध्ये व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज भाजप (BJP) आणि इतर संघटनांसह शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी रस्त्यावर उतरुन या घटनेचा तिव्र निषेध केला.
पोलिसांचा लाठीचार्ज
शहरातील राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून जोरदार निदर्शने केली. शहरातील संवेदनशील (Sensitive) परिसर असलेल्या राजकमल चौक, जवाहर गेट, जवाहर रोड, नमुना येथे असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज (Lathi charge) करत पाण्याचा मारा केला.
शहरात संचारबंदी लागू
अमरावती शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त (Amravati Violence ) ठेवण्यात आला असताना देखील बंद दरम्यान तोडफोडीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला.
पोलीस आयुक्तांनी सुट्टी रद्द केली
अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (CP Dr. Aarti Singh) या रजेवर आहेत. मात्र, शहरात बंददरम्यान हिंसाचार व जाळपोळ अशा घटना घडल्यामुळे त्यांनी तातडीने शनिवारी रात्रीपर्यंत शहरात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
इंटरनेट सेवा बंद
हिंसाचार व जाळपोळ अशा घटना घडल्यानंतर आयुक्तालयाच्या हद्दीत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.
तीन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.
परंतु ही बंदी कधी लागू होईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
5 पोलिसांसह युवक जखमी
अमरावती शहरातील अंबापेठ आणि राजकमल चौकात दुचाक्यांसह कारची जाळपोळ करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जसह अश्रूधुरांच्या नळकांड्या, प्लास्टिक बुलेटचा वापर केला.
लाठीमार व दगडफेकीत 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह जमावातील काही युवक जखमी झाले आहेत.
Web Title :- Amravati Violence | internet service off amravati closed commissioner of police aarti singh Amravati Violence
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime | कंपनीत सोबत काम करणार्या तरूणीवर जडला जीव, जेवणासाठी घरी बोलावून केली भानगड अन्…
- BSNL | स्वस्तात मस्त प्लान ! 36 रुपयांमध्ये डेटा, कॉलसह आणखी काही सुविधा, जाणून घ्या
- Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा दिलासा ! भाडे कमी होण्यासह सुखकर होईल रेल्वे प्रवास