Amrawati Crime News | नैराश्याच्या भरात 24 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, अमरावतीमधील घटना

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – Amrawati Crime News | अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय तरुणाने नैराश्याच्या भरात टोकाचे पाऊल उचलले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरातील सुलतानपुरा येथील रहिवासी युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. (Amrawati Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
श्रवण मोतीराम ठाकरे असे आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. श्रवण मोतीराम ठाकरे नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामे आटोपून सायंकाळी घरी आला. त्यानंतर त्याने आपली आई घराबाहेर गेल्याचे पाहून गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला. आई घरी परतल्यावर हि धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांना समजताच त्यांनी मोर्शी पोलिसांना याची माहिती दिली. (Amrawati Crime News)

या घटनेची माहिती मिळताच मोर्शी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्रवणला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. श्रवण याच्याकडे अडीच एकर शेती असून त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे तो प्रचंड तणावात होता. याच नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मोर्शी पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-  Amrawati Crime News | a young farmer ends life due to financial issues

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं