Amrawati Crime News | व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीकडून महिलेकडे खंडणीची मागणी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amrawati Crime News | आजकाल सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. असाच एक प्रकार अमरावतीत घडला आहे. मित्रासोबत सेल्फी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका अज्ञात व्यक्तीने तरुणीला 1 हजार 500 रुपयाची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 मार्च रोजी घडला असून पीडित मुलीच्या तक्रारीवरून संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Amrawati Crime News)

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ती वस्तीगृहात असताना तिला एका अज्ञात क्रमांकावरून संदेश आला होता. यावेळी तिने पुन्हा त्या क्रमांकावर संदेश करत कोण आहे अशी विचारणा केली. त्यानंतर संबंधित मोबाईल धारकाने मुलीला मी इंटर्नशिप दरम्यान अर्ज केला होता त्यानंतर तुझा नंबर त्या ग्रुप मध्ये ऍड झाले तिथूनच मला मोबाईल क्रमांक मिळाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तो मुलीशी ओळख वाढवण्यासाठी अनेक संदेश पाठवत होता मात्र मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. (Amrawati Crime News)

1 मार्च रोजी त्या मुलीला त्याच मोबाईल क्रमांकावरून एक व्हिडिओ पाठवण्यात आला.
व्हिडिओमध्ये तरुणी एका मित्रासोबत सेल्फी काढताना दिसत होती.
हा व्हिडिओ पाहून मुलगी घाबरली आणि त्या मोबाईल क्रमांकाच्या धारकाला विचारना केली की नेमके आपण
कोण आहे. त्यावर मी हॅकर आहे आणि मी काहीही करू शकतो असे त्या मोबाईल धारकाने म्हंटल्यानंतर मुलगी
आणखीनच घाबरली. त्यानंतर त्या मोबाईल क्रमांक धारकाने दिवसेंदिवस तरुणीचा पाठलाग सुरूच ठेवला.
मला 1500 रुपये दे नाहीतर तुझा हा व्हिडिओ तुझ्या घरच्यांपर्यंत पोहचवतो अशी धमकीसुद्धा त्याने दिली.
या संपूर्ण प्रकरणाला घाबरून शेवटी मुलीने बडनेरा पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

Web Title :-  Amrawati Crime News | amravati ransom was demanded from the girl by threatening to make the video viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Crime News | ओडिशामधून सांगलीत गांजा तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे पथकाकडून कडक कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime | MSEB मधून बोलत असल्याचे भासवून पावणे दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक, भोसरी मधील प्रकार

Ramdas Kadam | उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदमांचा इशारा, म्हणाले-‘… तर मानहानीचा दावा ठोकणार’