Amrawati Crime News | अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करून त्याचा व्हिडिओ केला अन्…, अमरावतीमधील धक्कादायक प्रकार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावतीमध्ये (Amrawati Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. यामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या आरोपीने पीडित मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले. तसेच त्याने तिचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) करून तिचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ बनवला. (Amrawati Crime News)

हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या मुलीला धमकीही (Threat) दिली. त्याने शारीरिक संबंध (Physical Relationship) सुरू न ठेवल्यास ॲसिड टाकून तुला व तुझ्या कुटुंबियाला संपून टाकेल अशी धमकी पीडित मुलीला दिली. अखेर हा वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने पीडित मुलीने अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे (Social Activist Gunjan Gole) यांच्याकडे तक्रार दाखल केली. (Amrawati Crime News)

यानंतर सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांनी आरोपी चिराग गांधी (Chirag Gandhi) याला समजूत घालायला बोलावले मात्र त्याने त्या ठिकाणी अरेरावीची भाषा केल्याने गुंजन गोळे व राजेश वानखेडे (Rajesh Wankhede) यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. यानंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांत (Gadge Nagar Police) आरोपी मजनू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title :- Amrawati Crime News | student was sexually abused incident in amravati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

Pune Crime News | येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी; दोन न्यायालयीन कैदी जबर जखमी

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावरील अपघाताचे चक्र थांबेना; कारची ट्रकला धडक, दोन महिला डॉक्टरांसह तिघे ठार

Pune PMC News | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उच्चांकी उत्पन्न; मागील आर्थिक वर्षात १४९ कोटी २९ लाखांची वसुली

Salim Durani Passed Away | भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike | सर्वसामान्यांना मोठा झटका ! वीज दरात मोठ्या प्रमाणात वाढ; जाणून घ्या नवे दर