अभिनेते अमरीश पुरी यांची मुलगी जगते ‘सामान्य’ आयुष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दिग्गज कलाकार अमरीश पुरी यांना आपण सर्वच ओळखतो. अनेक सिनेमात नकारात्मक भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारा कलाकार म्हणजे अमरीश पुरी आहे. त्यांनी अनेक अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

तुम्हाला माहिती आहे का अमरीश पुरी यांना एक मुलगी आहे. अमरीश यांची मुलगी खूपच सुंदर आहे. नम्रता असं तिचं नाव आहे. नम्रताचे काही फोटो समोर आले आहे. सध्या हे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. अनेकांना अमरीश पुरी यांच्या मुलीबद्दल माहीत नाही.

नम्रता ने ग्रेजुएशन के बाद सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में मास्टर्स की डिग्री ली है. तुम्हाला सांगू इच्छितो की, नम्रता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिला बॉलिवूडमध्ये रस नाही. ती एक कॉस्टयुम डिझायनर आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, 80 आणि 90 च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने अमरिश पुरी यांनी आपली स्वतंत्र ओळख तयार केली आहे. त्यांना 39 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पहिला रोल मिळाला होता.

अभिनेता बनण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत आले. परंतु ते स्क्रीन टेस्टमध्ये फेल झाले. त्यानंतर त्यांनी एलआयसीमध्ये नोकरी केली. सोबतच ते पृथ्वी थिएटर मध्येही काम करत होते. त्यानंतर ते हळूहळू जाहिरातीत दिसायला लागले. 12 जानेवारी 2005 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे निधन झाले.