अमृता फडणवीसांनी नवऱ्याला दिल्या ‘व्हेलेंटाईन डे’ च्या अशा शुभेच्छा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज ‘व्हॅलेंटाईन डे’ त्यामुळे सगळीकडे गुलाबी वातावरण आहे. क्रिकेटर्सपासून कलाकारांपर्यंत अगदी उत्साहात हा दिवस साजरा करत आहेत. मग त्यात राजकारणातील नेते मागे राहून कसे चालेलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही जोडी चांगलीच प्रसिद्ध आहे. त्यात व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावर काहीतरी स्पेशल व्हायला हवच. अमृता यांनी मुख्यमंत्र्यांसाठी एक स्पेशल गिफ्ट दिलं आहे.

तु सफर मेरा… हैं तु ही मेरी मंजील…! असं बोल असलेलं गाणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीने मुंबईत ‘उमंग’ या कार्यक्रमात गायलं होतं. तेच गाणं त्यांनी आज ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून शेअर केलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे.

‘उमंग’ हा कार्यक्रम मुंबई पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अमृता फडणवीसांच्या गाण्याने चार चाँद लावले. अमृता फडणवीसांच्या गाण्याला मुख्यमंत्र्यांनी देखील टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

दरम्यान, अमृता यांनी तेरे बिना गुजारा… ए दिल है मुश्कील… असं म्हणताच मुख्यमंत्र्यांचा चेहरा खुलल्याचं दिसून आले. या जुन्या आठवणींना उजाळा देत व्हॅलेंटाईन दिनी हे गाणं शेअर करून आपल्या नवऱ्याला व्हॅलेंटाईन गिफ्टच दिलं आहे.

पहा व्हीडिओ :-