अमृता फडणवीस यांचे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून अल्पावधीतच त्याला पसंती मिळत आहे. कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…हे गाण सोमवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी प्रदर्शित झाले आहे. मिसेस फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरील नारी शक्तीला गौरवित करणारे हे गाण प्रेक्षकांसाठी शेअर केले असून त्याला तुफान पसंती मिळत आहे.

अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असतात. त्या विविध विषय घेवून गाण सादर करतात. सोशल मीडियात या गाण्यांची जोरदार चर्चा होते. अनेकवेळा त्यांना नेटक-यांच्या ट्रोलिंगचा सामना करवा लागतो. पण त्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देतात. काही दिवसापूर्वीच अमृता फडणवीस यांनी 8 मार्चला आपल नवीन गाण रिलीज होणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही दिला होता. जेंव्हा ती संघर्षपथावर निघाली तेंव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही, असे या गाण्यातून मांडण्यात आले असून हे गाण प्रेक्षकांच्या चागंलेच पसंतीस उतरले आहे.