अमृता खानविलकर दिसणार ‘सत्यमेव जयते’ मध्ये 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

मराठी बरोबरच हिंदी सिनेमा सृष्टीत पदार्पण करत  दोन्ही क्षेत्रात नाव कमावलेली अभिनेत्री अमृता खानविलकर २०१८ मध्ये आपल्याला  एकामागोमाग एक हिंदी सिनेमामध्ये काम करताना दिसणार आहे. मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अक्षरक्षः वेड लावले आहे. अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर फक्त मराठीच नाहीतर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे.मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ या सिनेमा नंतर ती ‘किलर’ च्या भूमिकेत आपल्याला  पाहायला मिळणार आहे. आगामी काळात मराठी सिनेमासोबतच काही हिंदी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात झळकलेली अमृता आता पुन्हा एका नवीन सिनेमात वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb5cc920-8fdb-11e8-a5f5-158e8e1ff0cc’]

‘राझी’ या चित्रपटात अमृताने  खानविलकरने पाकिस्तानी आर्मीची पत्नी ‘मुनिरा’ यांची भूमिका केली होती.  त्यानंतर ‘डॅमेज’ या वेब सिरीजमधील ‘लोव्हीना’ हे Serial killerचे पात्रं साकारले. या सर्व पात्रांच्या सादरीकरणानंतर अमृता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पोलिसाची पत्नी ‘सरिता’ हे पात्र साकारुन प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरप्राईज करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अमृता अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची म्हणजेच सरिताची भूमिका साकारत आहे. अमृतासाठी सरिताची भूमिकेसाठी तिला विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाही. कारण खऱ्या आयुष्यात जसा अमृताचा स्वभाव आहे अगदी तसाच हुबेहूब सरिताचा आहे. बरोबर काय ,चूक काय याची योग्य जाणीव जशी अमृताला आहे तशीच सरिताला पण आहे. या चित्रपटाच्या आणि भूमिकेच्या निमित्ताने अमृताचा खरा स्वभाव आणि तिचे  खरे विचार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच मनोज बाजपेयी आणि मनमिळावू अमृता यांची पती-पत्नीची ऑन-स्क्रिन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48c4e431-8fdc-11e8-bb21-937f138928ce’]

अमृता मराठी, हिंदीमधील विविध शोमध्येही बिझी असते.बिझी शेड्युअलमधून वेळात वेळ काढुन ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. यापूर्वी तिने शाल, सतरंगी रे ,गोलमाल, नटरंग अश्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.  तिने  हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. हिंमतवाला , मुंबई सालसा   अश्या चित्रपटांमध्ये काम  केले आहे.  तिला २०१७  झी मराठीचा  महाराष्ट्राची फेव्हरट नायिका अवॉर्ड मिळाला आहे.