अभिनेत्री अमृता राव बनली आई ! गोंडस मुलाला दिला जन्म

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अमृता राव (Amrita Rao) आणि तिचा पती आरजे अनमोल (RJ Anmol) पहिल्यांदाच आईबाबा झाले आहेत. अमृतानं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. कपलनं चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे. रविवारी सकाळी त्यांच्या घरी या नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमृतानं तिच्या प्रेग्नंसीची बातमी मीडियापासून दूर ठेवली होती. सध्या तिचा फोटो समोर आला असून सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. परंतु अलीकडेच हे कपल एका हॉस्पिटलच्याबाहेर दिसले होते. यावेळी अमृताचं बेबी बंप स्पष्ट दिसत होतं. तिचा हा फोटो सोशलवर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर ती प्रेग्नंट असल्याचं सगळ्यांना कळालं होतं.

अमृता आणि अनमोल यांनी 2016 मघ्ये लग्न केलं होत. त्याआधी 7 वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा विवाहसोहळा हा खूप खासगी होता. अमृता आणि अनमोल यांना त्यांच्या गोष्टी खासगी ठेवणंच जास्त पसंत आहे.

अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये अमृता ठाकरे या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यामध्ये तिनं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारीत होता. अमृतानं या सिनेमात मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली होती.