‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार ‘आई’ ! तुफान व्हायरल झाला Baby Bump चा फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अमृता राव सध्या सोशलवर जोरदार चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिचा बेबी बंपवाला फोटो आहे. या फोटोत अमृता पती आरजे अनमोल सोबत दिसत आहे. यावेळी ते हॉस्पिटलच्याबाहेर दिसत आहेत. यावेळी अमृताचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. अमृता आणि अनमोल पहिल्यांदा आईबाबा होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अमृतानं तिच्या प्रेग्नंसीची बातमी मीडियापासून दूर ठेवली होती. सध्या तिचा फोटो समोर आला असून सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.

अमृता आणि अनमोल यांनी 2016 मघ्ये लग्न केलं होत. त्याआधी 7 वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा विवाहसोहळा हा खूप खासगी होता. अमृता आणि अनमोल यांना त्यांच्या गोष्टी खासगी ठेवणंच जास्त पसंत आहे.

सध्या अमृताचा बेबी बंपवाला फोटो खूप चर्चेत आहे. चाहत्यांनाही हा फोटो पाहून आनंद झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. अनेक चाहत्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये अमृता ठाकरे या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यामध्ये तिनं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारीत होता. अमृतानं या सिनेमात मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली होती.