Birthday SPL : सैफ अली खान नव्हे, तर क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ होता अमृता सिंहचं पहिलं प्रेम ! ‘या’ कारणामुळं तुटलं होतं नातं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि त्याची एक्स वाईफ अ‍ॅक्ट्रेस अमृता सिंह यांनी कुटुंबाचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. सैफ तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होता. आज (दि 9 फेब्रुवारी) अमृता तिचा 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. 80 दशकातील या फेमस अ‍ॅक्ट्रेसचं पहिलं प्रेम सैफ नसून एक क्रिकेटपटू होता.

एका रिपोर्टनुसार सैफ अली खानच्या आधी अमृताच्या आयुष्यात एक क्रिकेटपटू होता. हा क्रिकेटपटू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय म्हणून फेमस असणारे रवी शास्त्री होते.

सिने ब्लिट्झ मासिक 1986 आवृत्ती साठी अमृता आणि रवी यांनी एक फोटोशुट केलं होतं. तेव्हापासून दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली होती. अमृता 80 च्या दशकात फेमस आणि सक्सेसफुल अ‍ॅक्ट्रेस होती.

दोघांनी साखरपुडा केल्याच्याही अनेक बातम्या समोर येतान दिसल्या होत्या. नंतर अमृताच्या आयुष्यात अनेक वादळं आली आणि हे नातं तुटलं. इतकंच नाही तर रवी यांनीही या काळात एक विधान केलं होतं. ते म्हणाले, मला कोणतीही अभिनेत्री पत्नी म्हणून नको आहे. माझ्या पत्नीचं पहिलं प्राधान्य माझं कुटुंब आणि घर असलं पाहिजे.

यावर अमृतानंही भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, मी सुद्धा सध्या माझ्या करिअरमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. परंतु मला खात्री आहे की, काही वर्षांनंतर मी माझा पूर्णवेळ कुटुंबासाठी आणि मुलांसाठी देऊ शकेन. यानंतर दोघांनीही नात्याला पूर्णविराम दिला.

1990 साली रवी शास्त्री यांनी रितू सोबत लग्न केलं. 2012 साली दोघं वेगळे झाले. अमृतानं 1991 साली सैफ अली खान सोबत लग्न केलं. 2004 मध्ये दोघं वेगळे झाले.