‘या’ अभिनेत्यामुळे सारा अली खानवर भडकली तिची आई अमृता सिंह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सारा अली खानने  खूप कमी दिवसांत बॉलीवूडमध्ये आपले स्थान मिळवले आहे. साराने आत्तापर्यन्त फक्त दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु तिची क्युट अदा चाहत्यांना खूप आवडते. सारा आपल्या चाहत्यांसाठी नेहमी लेटेस्ट फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असते. परंतु यावेळी सारावर तिची आई अमृता सिंह प्रचंड चिडली आहे. कारण कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच नाव एकमेकांशी जोडलं  जात आहे. अशातच त्यांचा आगामी चित्रपट  ‘लव आजकल 2’ मध्ये ते दोघे दिसणार आहेत. दोघांच्या अफेयर बद्दल चर्चा चालू आहेत.

नुकतीच अशी बातमी समोर आली आहे की, सारा अली खानची आई अमृता सिंह तिच्या  मुलीने  कार्तिक आर्यनसोबत राहावे असे  इच्छित नाही.  बॉलीवूड रिपोर्टनुसार, सारा कार्तिक आर्यन सोबत ईद साजरी करायला देखील गेली होती. तेंव्हाचे व्हायरल झालेले फोटो आतापर्यंत इंटरनेट वर फिरता आहेत. परंतु अमृता सिंहला तो फोटो नाही आवडला. अमृताला कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच एकमेकांना भेटणं आवडत नाहीये आणि ती साराच्या या गोष्टीमुळे खूप नाराज आहे.