Lockdown : अमृतसरमध्ये बाजारांत लोकांची गर्दी

अमृतसर : वृत्त संस्था – भारतातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने लागू करण्याआधीच पंजाब राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात पंजाबला काहीअंशी यशही आलं. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन करण्यावरही राज्य सरकारनी भर दिला होता.

पण पंजाबमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. सर्व प्रकारची काळजी घेऊनही ही संख्या वाढत आहे. अमृतसरमध्ये रुग्णांची संख्या बरीच आहे. अमृतसर शहरातील झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्ती हे या कोरोना संसर्गाचं मोठं कारण आहे त्याचबरोबर लोक आपल्याला झालेला आजार लपवून ठेवत आहेत.

पंजब सरकारने आता जरा नियम शिथल करायाला सुरुवात केली आहे. शुक्रवारपासून सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवायला सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अमृतसरमधील बाजारात लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत होते ही जमेची बाजू आहे.