अमृतसर रेल्वे दुर्घटना ; मृतांच्या कुटुंबीयांना केंद्राची आर्थिक मदत, एकुण ६५ मृत्युमुखी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमृतसर रेल्वे अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या अपघातात ६५ लोकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेल्वे जालंदरवरुन अमृतसरला येत असताना जोडा फाटक याठिकाणी ही दुर्घटना घडली. जवळपास ३००हून अधिक लोक याठिकाणी रावन दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. पंतप्रधान, राष्ट्रपतींसह देशभरातील अनेक मान्यवरांनी याविषयी दु:ख व्यक्त केले आहे.

अमृतसर रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. या अपघातास कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मग ती व्यक्ती नवज्योत कौर सिद्धू असली तरीही, असे अमृतसरचे आमदार गुरजीत सिंह यांनी म्हटले आहे. ते सिव्हिल हॉस्पिटल येथे उपस्थित होते.

भारतातातील मोठे दहा रेल्वे अपघात

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. याप्रकरणी केंद्र सरकार सर्व मदतीसाठी तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. रेल्वे अपघाताने आपल्याला फार दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुखा:त आपण सहभागी आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

या घटनेने आपण दु:खी झालो आहोत. रेल्वेकडून तत्काळ बचावकार्य सुरू झाले असून आणि सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत म्हटले आहे. ही घटना धक्कादायक आहे. पंजाब सरकार आणि काँग्रेस कार्यकत्र्यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य करावे, अशी आपण विनंती करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असून जखमींना लवकर बरे व्हावे, अशी कामना करतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.