‘अंमली’ पदार्थ तस्करीत दोषी आढळल्याने पोलीसाची गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका पोलीस कर्मचाऱ्यांने हिरोइन तस्करी प्रकरणात दोषी आढल्याने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. हा धक्कादायक प्रकार अमृतसरमध्ये घडला. ज्यात ५३२ कोटी रुपयांच्या हिरोइनची तस्करी करण्यात आली होती. या प्रकरणात दोषी आढळलेला आरोपी पोलीस अटारी बॉर्डरवर तैनात होता. या पोलिसाचे नाव अवतार सिंह आहे, ज्याला सोमवारी हिरोइन आणि इतर अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. घटनेच्या दिवसी पोलीस आरोपी अवतार सिंह आणि त्याचा दुसरा साथीदाराला पोलीस कोर्टात सादर करण्याच्या तयारीत होते.

या आरोपी पोलिसाने स्वत:च आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटना घडताना अवतार सिंह याचा साथीदार त्याच्या सोबत होता. पोलिसांनी या दोघांना अटक केली होती, ते तुरुंगात असताना तेथे उपस्थित असलेल्या पोलीसाच्या हातातील बंदूक हिस्कावून त्यांना स्वत:ला गोळी मारली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार अवतार सिंह हा मूळचा अमृतसरच्या छरहटाचा रहिवासी आहे तर दुसरा आरोपी जोरावर सिंह हा अचिंतपूरचा रहिवासी आहे. दोघेही अनेक वर्षापासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते. या घटनेनंतर आता अमृतसर पोलिसांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like