…तर मुंबईत घडली असती अमृतसर रेल्वे दुर्घटनेची पुनरावृत्ती 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – अमृतसर येथील दसऱ्याच्या रावण दहन कार्यक्रमाच्या वेळी घडलेली न दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आज मुंबईत घडली असती. मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आज  जीव धोक्यात घालून  दिवा रेल्वे स्थानकात पटरीत उतरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. केवळ आॅफिसला उशीर होऊन आठवड्याची सुरुवात लेट मार्कनं होऊ नये म्हणून हा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर सदर प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांच्या या जीवघेण्या प्रयत्नामुळे अमृतसर मधील रेल्वे दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली असती.
आज ऐन गर्दीच्यावेळी सकाळीच मध्य रेल्वे कसारा ते वासिंद सेवा ठप्प झाली होती. ऑफिसला वेळेत पोहचण्यासाठी घाई गडबडीत असणाऱ्या नोकरदार वर्ग आणि इतर प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. खडवली आणि वासिंदच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. यादरम्यान, काही प्रवाशी जीव धोक्यात घालून सीएसएमटीकडे जाणारी धावती लोकल पकडण्यासाठी रेल्वे पटरीवर उतरले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तेव्हाच  विरुद्ध दिशेने एक लांब पल्ल्याची ट्रेन देखील येत तेथे आली. क्षणभर सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.

चक्क पायाने धुतलेल्या भाज्याच विक्रीसाठी – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
विरार येथील, पिंपात भाज्या भरून चक्क त्या पायाने धुतल्या जात असल्याचा वचित्र प्रकार समोर आला आहे. भाजी विक्रेत्याकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं आता उघड झालं आहे.
सदर प्रकार विरार पूर्व भागातल्या चंदनसार भाजीबाजारात हा प्रकार सुरू असल्याचं दिसून आलं आहे. एका पिंपात भाजी, काकड्या, गाजरं भरून ती पायाने धुतली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. आश्चर्यकारक म्हणजे भाजीविक्रेत्याने झालेला प्रकार मान्य करत, अशीच भाजी धुतली जाते असंही मान्य केले आहे. हा प्रकार खुले आम सुरु आहे. पायाने धुतलेल्या या भाज्याच विक्रीसाठी येत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भाजी विकत घेताना नागरिकांना विचार करावा लागणार आहे. स्थानिक प्रशासनाकडूनही याबाबत कोणतीही कारवाई केली  नसल्यातचेही समजत आहे.
जाहिरात