एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

पोलीसनामा ऑनलाईन : असं म्हणतात ना कि, प्रेमाला जातपात, धर्म, वय, वर्ण, काळ- वेळ, लिंग असं कोणतंच बंधन नसत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या दिडौली क्षेत्राच्या एक गावातून समोर आली आहे. येथील दोन तरुणींनी आपसात लग्न करण्याचा निश्चय केला. त्यांचे हे म्हणणे ऐकून कुटुंबीयांसमोर अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली. तरुणींच्या हट्टामुळे बुधवारी दोघींच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांसोबत पंचायत बसवली. अखेर नातेवाईकांनी दोघींची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी राजी केले.

वास्तविक, दिडौली कोतवाली येथे राहणाऱ्या 20 वर्षीय मुलीचे नातेवाईक गजरौला पोलिस स्टेशन परिसरातील खेड्यात राहतात. दिडौली भागातील तरुणी दोन वर्षांपूर्वी गजरौला भागातील एका तरुणीच्या संपर्कात आली होती. या दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली. दोन्ही तरुणी नेहमी एकमेकींच्या घरी बरेच दिवस येऊन राहत असत. बुधवारी सकाळी गजरौला येथे राहणारी मुलगी दिडौली गावात राहणार्‍या दुसर्‍या तरुणीच्या घरी पोहोचली. दोघीनी एकमेकांशी चर्चा केली. त्यानंतर थोड्या वेळातच या दोन्ही मुलींनी आपापल्या नातेवाईकांना एकमेकींची लग्न करण्याचा इच्छा व्यक्त केली.

तरुणींचे हे म्हणणे ऐकून कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी दोघींच्या लग्नास स्पष्टपणे नकार दिला. पण मुलींनी लग्नाचा आग्रह धरला. यामुळे नातेवाईक हैराण झाली. काही वेळानंतर तरुणींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी नातेवाईकांची पंचायत बसवली. बरीच मेहनत घेतल्यानंतर पंचायतीने मुलींना शांत केले. यानंतर गजरौलाच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला घरी नेले. निरीक्षक अजय कुमार यांनी प्रकरण सज्ञान असल्याने त्याचे खंडन केले आहे.