Amruta Dhongade | ‘मिसेस मुख्यमंत्री’ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

तेजस बर्वे आणि अमृता धोंगडे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Amruta Dhongade ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Dhongade) आणि ‘सुमी’ चा लाडका ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे (Tejas Barve) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 2022 या नव्या वर्षात अमृता धोंगडे आणि तेजस बर्वे यांची जोडी छोट्या नाही तर मोठ्या पडद्यावर पेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘दिशाभूल’ आहे.

 

सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मित आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पुण्यात पार पडला. यावेळी अभिनेता तेजस बर्वे, निर्मात्या आरती चव्हाण, नीलेश आर. विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, संगीतकार प्रथमेश धोंगडे, गीतकार हरिभाऊ धोंगडे, नृत्य दिग्दर्शक नील राठोड, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, वेशभूषाकार शीतल माहेश्वरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. (Amruta Dhongade)

 

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले की, ‘दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळणार आहे. ‘दिशाभूल’ मध्ये अमृता धोंगडे, तेजस बर्वेसह आणखी एक जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, ‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे.
नवीन वर्षांची सुरुवात एका मराठी चित्रपटसह करताना आम्हाला आनंद होत आहे.
आम्ही अमृता आणि तेजस यांच्यासह मराठीतील नामवंत कलाकारांना एकत्र घेऊन एक वेगळा प्रयोग करत आहोत,
त्याला प्रेक्षक साथ देतील असा विश्वास वाटतो.

 

Web Title :- Amruta Dhongade | ‘Mrs. CM’ duo to ‘mislead’ on big screen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus Restrictions | सगळं सुरु मग ब्युटी पार्लर आणि जीम का बंद? वादानंतर सरकारचा मोठा निर्णय; ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध

Railway Station Development Fee | नववर्षात रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! एअरपोर्ट प्रमाणे भरावा लागेल स्टेशन युजर चार्ज

Chandrakant Patil | ‘हे सरकार गेंड्यापेक्षा ही जास्त असंवेदनशील’ ! राज्यातील निर्बंधावरुन चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका