ट्विटरवर ‘अ‍ॅक्टिव्ह’ असणार्‍या अमृता फडणवीस फक्त ‘या’ 3 जणांना करतात ‘फॉलो’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ट्विटरवर सक्रिय झाल्या आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडल्यानंतर याचा परिणाम देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबंधावर झाला. हे दोन्ही नेते आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंडवरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याला शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकामागोमाग एक ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यानच्या काळात अमृता फडणवीस आणि शिवसेना याच्यामध्ये ट्विटर युद्ध सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

अमृता फडणवीस या ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधत असल्याने त्यांचे ट्विटर हँडलरीही चर्चा होताना दिसत आहे. अमृता फडणवीस यांना ट्विटरवर जवळपास 1 लाख 20 हजार लोक फॉलो करतात. मात्र अमृता फडणवीस या फक्त तीन व्यक्तींनाच फॉलो करतात. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, महानायक अमिताभ बच्चन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच त्या पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडललाही फॉलो करतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/