प्रियांका गांधींच्या एंट्रीवर Mrs CM म्हणाल्या…. 

वृत्तसंस्था : प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे चर्चेला उधाण आले आहे. भाजपकडून प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशावर जोरदार टीका केली जात आहे.

असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र प्रियांका यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेवरून मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलत चर्चाना उधाण आले आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “कुठल्याही महिलेने राजकारणात प्रवेश करणं हे सर्वच महिलांच्या हिताचं असतं. हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रियांकांना राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा” प्रियांका गांधींना शुभेच्छा देत असतानाच प्रियांकाच्या आगमनामुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

याबरोरच, भाजपसाठी ही काही फार मोठी घटना नाही. उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि अमेठी अशा दोन जागांवर जिंकणं हे भाजपसाठी फार मोठा धक्का नाही असंही त्या म्हणाल्या.

केवळ बुधवारी काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची घोषणा केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रियांका यांना सरचिटणीस हे पद देण्यात आलं असून पूर्व उत्तर प्रदेशचा प्रभारी नियुक्त करण्यात आलं होतं. आत्तापर्यंत पडद्यामागून राहुल गांधी यांना मदत करणाऱ्या प्रियांका आता सक्रिय राजकारणात दिसणार आहेत. सोनिया गांधीच नाही तर राहुल गांधी यांच्या विजयामध्ये देखील प्रियांका गांधी यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली आहे.

नेहरू घराण्याचा राजकारणावर प्रभाव
नेहरु-गांधी घराण्याचा देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. आता प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश केल्याने एक वर्तुळ पूर्ण झालं. आत्तापर्यंत प्रियांका या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना मदत करत होत्या. आता त्यांना आपलं कतृत्व सिद्ध करुन दाखवावं लागेल. सक्रिय राजकारणात आलेल्या प्रियांका गांधी वड्रा या गांधी-नेहरु घराण्याच्या 11 व्या सदस्य आहेत.

हरु घराणं हे मुळं काश्मीरचं कौल घराणं. कश्मीरमध्ये कालवे मोठ्या प्रमाणावर आहेत. हिंदीत त्यांना ‘नहर’ असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या ‘नहर’च्या काठावर राहणारे म्हणून त्यांचं आडनाव कौलचं नेहरु असं झालं. नंतर ते अलाहाबादला स्थायिक झाले.

पंडित नेहरु यांचे वडिल मोतीलाल नेहरु यांच्यापासून या घराण्याच्या राजकारण प्रवेशाची सुरुवात झाली. ते बॅरिस्टर होते आणि स्वातंत्र चळवळीत सक्रिय होते. 1920 आणि 1929 असे दोन वेळा ते काँग्रेसचे अध्यक्षही होते.