Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांनी ट्रोलिंगवर मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या – ‘काही गाणी…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Amruta Fadnavis | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘आज मैं मूड बना लिया ये असे या गाण्याचे शीर्षक असून, नव्या वर्षात रिलीज झालेल्या या गाण्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या गाण्यावरुन त्यांना ट्रोलही केले जात आहे. अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ‘टी सीरिज’ बॅनर खाली बनवण्यात आलं असून, या गाण्याने आता 3 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. (Amruta Fadnavis)

 

अमृता फडणवीस यांच्यासोबतच प्रसिद्ध गायक जोडी मीत ब्रदर्सनेही आपल्या मधुर आवाजात हे गाणे संगीतबद्ध केले आहे. अमृता फडणवीस यांनी 6 जानेवारी रोजी आपला हा नवा व्हिडीओ रिलीज केला आहे. नुकतंच अमृता फडणवीस यांनी एका चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. त्या म्हणाल्या कि “मूड बना लिया हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला ते आवडलं. मी त्यात अभिनयही केला आहे. हे गाणं गाताना किंवा त्यात अभिनय करताना त्यात 100 टक्के योगदान द्यायचं हेच मी ठरवलं होतं. (Amruta Fadnavis)

यानंतर या गाण्याचे काय होईल, याचा मी विचारही केला नाही. अनेकदा खूप चांगली गाणी असतात जी अजिबात हिट होत नाही. तर काही गाणी फार ऐकण्यासारखी नसली तरी ती हिट ठरतात. ते एक वेगळं समीकरण असतं. त्यावेळी मी हे गाणं नीट बोलायचं आहे हेच ठरवलं होतं. हे गाणं योग्य वेळी आलं आहे. हे गाणं हिट होईल, याची मला कल्पना होती. पण ते इतक्या कमी वेळात आणि एवढ्या पटीने याची कल्पना नव्हती.
या गाण्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, यासाठी धन्यवाद”, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात.
कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात.
याआधी देखील त्यांची काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’,
‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.

 

Web Title :- Amruta Fadnavis | actress amruta devendra fadnavis talk about mood banaleya song trolling

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Satyajit Tambe | ‘मी काँग्रेसचाच उमेदवार’, सत्यजीत ताबेंनी सांगितलं अर्ज भरण्यामागचं कारण

Usman Khawaja | ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाच्या शॉटचा Video व्हायरल; “सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला आणि…!”

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर