Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या अनेक नव्या गाण्यामुळे चर्चेत येत असतात. विविध गाणी गायल्याने त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. नुकतंच अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना एका नवीन गाण्याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, गणेशोत्सवाच्या आधी आपलं नवीन गाणं येत आहे. यावरुन आता त्याचं नवीन गाणं रिलीज झालं आहे. ‘गणेश वंदना’ (‘Ganesh Vandana’) या नावाने त्याचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अमृता फडणवीस यांनी ‘गणेश वंदना’ या गाण्यामधुन त्यांनी एक सुंदर मेसेज दिला आहे. कोरोना काळातील कोविड योद्ध्यांना हे गाणं त्यांनी समर्पित केलंय. एकूण 4 मिनिट 49 सेकंदाचं हे गाणं आहे. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या डॉक्टरच्या (Doctor) रुपात दिसुन येत आहेत. दरम्यान, गणेश वंदना’ हे गाणे सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना समर्पित केलं आहे. ‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’ असे त्यांनी या गाण्याच्या माध्यमातुन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 

या दरम्यान, अमृता यांनी हे गाणे गायिले असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना कोणताही सण, उत्सव असो समाजप्रतीची त्यांची कर्तव्ये पार पाडावी लागतात हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या गाण्यामधुन केला आहे. अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात करिअर करत आहेत. गाणं हा त्यांचा आवडता छंद आहे, या आगोदरही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत.

 

हे देखील वाचा

Anti Corruption | मिरज तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pimpri Crime | थकीत घरभाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरुन ढकललं, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Sanjay Raut | ‘बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकेल’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Amruta Fadnavis | amrita fadnaviss new song released message conveyed through song ganesh vandana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update