Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमृता फडणवीस धमकी प्रकरणात (Amruta Fadnavis Threat Case) अटक करण्यात आलेल्या अनिक्षा जयसिंघानीला (Aniksha Jayasinghani) जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिक्षा जयसिंघानीवर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे, त्यांना धमकावणे, असे आरोप आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अनिक्षाला अटक (Arrest) केली होती. परंतु सत्र न्यायालयाने तिला जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.
अनिक्षा जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मागील सुनावणीत तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी सुनावल्यानंतर तिने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी जरी संपर्कात असली तरी अनिक्षा जयसिंघानीचा या प्रकरणाशी कुठलाही थेट संबंध नव्हता. त्यांचे सुरुवातीपासूनच चांगले संबंध होते. यामुळे राजकीय हेतूने अनिक्षाला यामध्ये गुंतवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला.
चौकशी पूर्ण झालेली आहे. यात जास्तीतजास्त जी शिक्षा आहे, ती सुद्धा जामिनास पात्र आहे. त्यामुळे अनिक्षा ही विधी शाखेची विद्यार्थीनी असून ती लॉचं शिक्षण घेत आहे, त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तीवाद तिच्या वकिलांनी न्यायालयात केला. वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत मुंबई सत्र न्यायालयाने अनिक्षा जयसिंघानी हिचा जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य करण्याच्या अटीशर्तींही कोर्टाने बजावल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच (Amruta Fadnavis Bribery Case) देण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar Hill Police Station)
20 फेब्रुवारी रोजी एफआयआर (FIR) दाखल केला. पोलिसांनी डिझायनर अनिक्षाला ताब्यात घेतले आहे.
अनिक्षाने वडिलांना सोडण्यासाठी एक कोटी रुपये लाच देण्याचा तसेच ब्लॅकमेल
करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध आयपीसी 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Web Title :- Amruta Fadnavis | amruta-fadnavis-fraud-case-designer-aniksha-
jaisinghani-granted-bail
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update