Amruta Fadnavis | आवडते नेते कोण?; ‘घर की मुर्गी, दाल बराबर’, म्हणत अमृता फडणवीसांनी सांगितलं आवडत्या नेत्याचं नाव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या आवडत्या नेत्याचं नाव सांगितलं आहे. नागपूरमधील (Nagpur) एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. उपस्थितांना वाटलं त्या, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतील मात्र तसं काही झालं नाही. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी विदर्भातील एका नेत्याचं नाव घेतलं.

 

माझ्या आवडत्या नेत्याचं नाव या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. हे बघा सगळ्यांसाठी घर की मुर्गी दाल बराबर असते. त्यामुळे माझे आवडते नेते हे नितीन गडकरी (Nitin Gadkari) आहेत, असं अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) मिश्कीलपणे म्हणाल्या. अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमृता फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवरही टीका केली.

 

महाराष्ट्रामध्ये आमची एकच अपेक्षा आहे ती म्हणजे प्रगतीचं राजकारण (Politics) व्हायला हवं, भ्रष्टाचार (Corruption) बंद व्हायला हवा. मात्र आजकाल महाराष्ट्रातील नेत्यांचा हाच विचार आहे की मैं खाऊंगा भी, खाने भी दूँगा, खानेवालोंकी रक्षा भी करूंगा. हे बंद व्हायला हवं. बाकी तुम्ही काही खा, काही खाऊ नका, त्याने काही होत नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने किंवा त्यांच्या गाण्यांमुळेही त्या कायम चर्चेत असतात.
मात्र आता महाविकास आघाडी सरकारकडून अमृता फडणवीसांच्या टीकेला कोण प्रत्युत्तर देतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis funny comment on devendra fadnavis in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे महापालिकेने थकबाकीदारांचे तब्बल 27 गाळे केले सील; आंबेगाव येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशनचे मैदानही घेतले ताब्यात

 

Hemant Rasne | सुवर्णयुग सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदी नितीन राऊत

 

Jitendra Awhad | पुणेकरांसाठी मोठी गुडन्यूज ! धानोरी येथे म्हाडाचा नवा प्रकल्प उभारणार – मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती