Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; नव्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

0
730
Amruta Fadnavis | amruta fadnavis new song sare jahan se acha release
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या ‘मूड बना लिया’ या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. या गाण्याला नेटकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. यानंतर अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. यादरम्यान अमृत फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गायलेल्या एका गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ वायरल होताना दिसत आहे.

अमृता फडणवीस यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ या नव्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत अमृता यांनी म्हटले की, “प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा….. ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीत गाण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. या गाण्याला श्री सत्य कश्यप यांनी संगीत दिले आहे”. तर अमृता यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट चा वर्षाव सुरू केला आहे. आता पर्यंत अमृता यांनी मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी गायली आहेत.

आतापर्यंत या गाण्याला 12 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
The New Blood Bharateeyans अल्बममधील हे गाणे आहे.
या गाण्याला आतापर्यंत हजारो लाईक देखील मिळाले आहेत.
सध्या अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी त्या बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमांमध्ये देखील झळकल्या होत्या.

Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis new song sare jahan se acha release

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

Pune Crime News | ‘तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा छळ, जर्मनीत राहणाऱ्या पतीविरोधात पुण्यात FIR