Amruta Fadnavis | ‘मॅडम चतुर, हीच तुमची औकात’, अमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये शाब्दिक चकमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न (Amruta Fadnavis Bribery Case) झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी करावाई करुन अनिक्षा नावाच्या डिझायनरला उल्हासनगर येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेवरुन ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे.

 

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?
प्रियंका चतुर्वेदी यांनी या घटनेबाबत ट्विटकरत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लक्ष केलं होतं. एका गुंडाच्या मुलीला मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्यास मिळत आणि पाच वर्ष त्यांच्या पत्नीशी मैत्री करते. त्यांच्या पत्नीला दागिने, कपडे देते. त्यांच्या कारमधून फिरते. ही डिझायनर मैत्रीण त्यांना आपण बुकींची माहिती देत, त्यांच्यावर धाड टाकत आणि तडजोड करत त्यातून पैसे कमावू शकतो असं सुचवते. पण त्यानंतरही त्यांची मैत्री कायम राहते. आता यासंबंधी व्हिडिओ आणि आरोप आहेत. महाराष्ट्रात काय सुरु आहे, असं ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केले आहे.

 

चतुर्वेदी पुढे म्हणतात, आता उपमुख्यमंत्री हा राजकीय कट असल्याचं म्हणतात. राज्याचे पोलीस (Maharashtra Police) नक्की कोणाला रिपोर्ट करतात? देवेंद्र फडणवीसांना, राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, तक्रारदार कोण आहे? अमृता फडणवीस… मग याप्रकरणी स्वतंत्र चौकशी नको का? तसेच गृहमंत्र्यांनी व्हिडिओशी छेडछाड केल्याचा दावा केला आहे. पण जर हे विरोधी नेत्यासोबत झालं असतं तर उपमुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार, ईडी (ED), सीबीआय (CBI) अशी आरडाओरडा केली असती, असंही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

अमृता फडणवीसांनी काढली ‘औकाद’
प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला अमृता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मॅडम चतुर, हीच तुमची औकात’ असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मॅडम चतुर- आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी Axis बँकेला फायदा करुन दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात-तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी-पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती-तीच तुमची औकात आहे.’

 

अमृता फडणवीस पुढे म्हणतात, ‘मला माहीत आहे की, तुमची औकात म्हणजे मास्टर्स बदलणे आणि प्रामाणिक आणि स्वतंत्र महिलांना खाली खेचणे.
मिस चतुर, तुम्हाला स्वतंत्र तपासासाठी नाक खुपसण्याची काय गरज होती? मी स्वत: याची मागणी करत आहे.
जेणेकरुन या फसवणुकीमागील खऱ्या चेहऱ्यांसह सत्य उजेडात येऊ द्या’ असं म्हणत अमृता यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Web Title :- Amruta Fadnavis Amruta Fadnavis-Priyanka Chaturvedi clash verbally ‘Madam Chatur, this is your place’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 25 हजाराच्या लाच प्रकरणी नायब तहसिलदारासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर