Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा. मला मध्ये आणू नका, अशा शब्दांत अमृता फडणवीस (Amruta Fadnavi) यांनी नवाब मलिक यांचे नाव न घेता हल्ला चढवला आहे.

अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप स्त्रियांनाही ओढले जात आहे. त्यावर तुमचं काय मत आहे असे विचारण्यात आले. यावर उत्तर देताना त्यांनी टीकास्त्र सोडलं. ज्या स्त्रिया सरळ मार्गाने जात आहेत त्यांना डिवचू नका, असं मी दोन दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. देवेंद्रजींना टार्गेट करायला तेच आज माझ्याबाबतीत केलं गेलं. तुम्ही मर्द आहात ना? डायरेक्ट त्यांना टार्गेट करा. मला मध्ये नका आणू. एक समाज सेविका म्हणून मी माझे विचार प्रकट करत असते आणि करत राहणार. मला कोणीही थांबवू शकत नसल्याचे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी म्हटले.

जावयाला विचारा कोण कुणाच्या पाठिशी

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरच्या (Drugs peddler) पाठिशी असल्याचा आरोप करण्यात आला.
यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, त्यांनी त्यांच्या जावयाला विचारवं कोण कुणाच्या पाठिशी आहे.
बेनकाब नवाब भी होता है और वो जरुरु होगा. फक्त वेळ यावी लागते, असं सूचक विधान त्यांनी केलं.
मी ट्विट केलं. काही लोकांना काहीच सूचत नाही, त्याबद्दल मी ट्विट केलं आहे.
जेव्हा एखाद्या माणसात निगेटिव्हिटी आलेली असती तेव्हा तो खराबच विचार करतो.
बाकी काही नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | सलग 13 तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

NEET UG Result 2021 | एनटीएने मेडिकल प्रवेश परीक्षा NEET चा निकाल केला जाहीर

Pune Crime | गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक ! परदेशी निघालेल्या एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी, पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली एअरपोर्टवर पकडलं; दाम्पत्यास ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाचे पुण्याकडे ‘प्रयाण’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Amruta Fadnavis | amruta fadnavis reply to nawab malik over his allegations on devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update