Amruta Fadnavis | ‘मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवं’ – अमृता फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर 38 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) करण्यात आला. शिंदे गटाच्या (Shinde Group) 9 आणि भाजपच्या (BJP) 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर काही दिवसांनी खातेवाटप करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसल्याने टीका करण्यात आली होती. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान असायला हवे अशी अपेक्षा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी व्यक्त केली.

 

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारने आता अधिक ताकदीने आणि जोमाने राज्यकारभार करायला हवा. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात थोडे मागे पडले आहे. पायाभूत सुविधा आणि प्रोजेक्ट्स यावर भर देऊन नव्या सरकारला डबल मेहनतीने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळात महिलांनाही स्थान असायला हवे, अशी अपेक्षा देखील त्यांनी बोलून दाखवली.

 

महिलांनी पुरुषांप्रमाणे अधिक मेहनत करुन कमांड मिळवायला हवी. डिमांड करण्यापेक्षा कमांड असण्यावर भर द्यावा, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्थान असायलाच हवे. पुरुषांपेक्षा अधिक मेहनतीने महिला त्या स्थानी बसतील, तेव्हा तिला मिळणारा आदर मोठा असेल, असेही त्यांनी म्हटले.

 

मंत्रिमंडळावर फडणवीसांचा वरचष्मा

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
या दिग्गज भाजप (BJP) नेत्यांना धक्का देण्यात आला आहे. काहींना अनपेक्षितपणे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहिर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते.
या खातेवाटपावर फडणवीस यांचाच वरचष्मा दिसून आला आहे.

 

Web Title : – Amruta Fadnavis | amruta fadnavis said women should included in eknath shinde and devendra fadnavis govt

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा