Amruta Fadnavis | ‘…नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही’ – अमृता फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या विषयांवरून तापलेलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता. अमृता फडणवीस अनेकदा राजकीय ट्विट करत असल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. मात्र यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागतो. यासंदर्भात बोलताना त्यांनी (Amruta Fadnavis) ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

 

मी जे काही ट्विट डिलीट केले असतील ते देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यावरून केले आहेत, नाहीतर मी कोणाच्या बापाला भीत नसल्याचं अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसही होते.

 

यावेळी त्यांना तुम्हाला मामी (Mami) म्हटल्यावर कसं वाटत ?, असा सवाल करण्यात आला. यावर मला मजा वाटते कधी थोडं लो वाटलं तर मीम्स (Memes) पाहून घ्यायचे, फार छान वाटतं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मात्र अमृता फडणवीसांना ट्रोल केल्यावर दु: ख होत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

दरम्यान, माझी अपेक्षा असते तिने राजकीय ट्विट करू नयेत पण शेवटी तिची मत ही तिची आहेत.
मी जेव्हा ट्रोलिंग पाहतो तेव्हा मला कधीकधी दु:ख होतं. पण ती घाबरत नाही, कारण तिला सांगावं लागतं फार झालं आता,
असं फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis slams twitter trollers while speaking with devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा