Amruta Fadnavis | CM शिंदे धमकी प्रकरणाच्या टीकेला अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर; यशोमती ठाकूरांना म्हणाल्या – वेगळा दिमाख असणार्‍या…

ठाणे : Amruta Fadnavis | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला (Intelligence Department) मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. मात्र, ही धमकी खोटी असल्याचे पोलिस तपासात नंतर निष्पन्न झाले. एका तरूणाचा दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी वाद झाल्यानंतर त्याने हॉटेल मालकाला अद्दल घडवण्यासाठी पोलिसांच्या 100 नंबरवर फोन करून खोटी माहिती दिली होती. या धमकी प्रकरणाचे सत्य समोर आले असले तरी यावरून सुरू झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. (Amruta Fadnavis)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमकीवर टीका करताना काँग्रेस (Congress) नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमक्या येत असल्यावरुनच देशाची, राज्याची अवस्था बिघडलेली असल्याचे वाटते. दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता यांनी म्हटले की, धमक्या येणं देशाची अवस्था नाही असे सांगत. वेगळा दिमाख (मेंदूची) असणार्‍या लोकांची विचारसरणी यामधून दिसून येते. मला वाटतं त्यांच्यातलेच हे लोक असू शकतात, आपल्याला काय माहित? असे फडणवीस म्हणाल्या. त्यांनी डोंबिवलीमध्ये दोन ठिकाणी नवरात्रोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

अमृता यांनी म्हटले की, यापुढील प्रत्येक निवडणूक ही विकासाची असेल याच हेतूने भाजपा (BJP) निवडणूक लढेल.

Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis slams yashomati thakur over threat call comment to cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा, म्हणाले-‘कायदा मोडला तर…’ (व्हिडिओ)

Maharashtra Political Crisis | शिवसेना, विश्वासघात अन् काँग्रेस; तेव्हा वसंतसेना म्हणून शिवसेनेला हिणवले जायचे

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचा विशेष प्लॅन, ‘या’ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती