
Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीसांना एक कोटी लाच देण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला घटनाक्रम (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis Bribery Case | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका फॅशन डिझायनर (Fashion Designer) महिलेने एक कोटी रुपयांची लाच देण्याची (Amruta Fadnavis Bribery Case) ऑफर केली. परंतु अमृता फडणवीस यांनी या महिलेकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिने त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केला. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रातून छापून आल्यानंतर त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सभागृहात सांगितला.
अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी हे प्रकरण सभागृहात विचारल्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) नावाचा व्यक्ती जो मागील 7-8 वर्षापासून फरार आहे. त्याच्यावर 14-15 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मुलीने अत्यंत हुशारीने गेल्या दीड वर्षांपासून माझ्या पत्नीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. अनिल जयसिंघानी यांची मुलगी शिकलेली असून खूप हुशार आहे. (Amruta Fadnavis Bribery Case)
ती 2015-16 दरम्यान अमृता यांना भेटत होती. त्यानंतर तिचे येणे बंद झाले. त्यानंतर अचानक 2021 मध्ये या मुलीने माझ्या पत्नीला भेटण्यास सुरुवात केली. मी डिझाईनर आहे. कपडे, ज्वेलरी तयार करते. बेस्ट 50 पॉवरफूल व्ह्यूमनमध्ये तिचं नाव आलं आहे. अमृताच्या हस्ते तिने पुस्तक प्रदर्शन केले अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने अमृताचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
My statement in Legislative Assembly on the news published in ‘Indian Express’ and on the question raised by LoP Ajitdada Pawar..
'इंडियन एक्सप्रेस' या दैनिकात प्रकाशित वृत्तासंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर विधानसभेत केलेले निवेदन…… pic.twitter.com/D5QLJJRBgI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 16, 2023
त्यानंतर एकदा तिने अमृताला सांगितले की, माझ्या वडिलांना चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलं आहे. तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी मदत करा. माझ्या पत्नीने तुम्ही निवेदन द्या, त्यावर चौकशी होईल असे सांगितले. माझे वडील सर्व बुकीजला ओळखतात. आम्ही बुकीजची माहिती द्यायचो आणि दोन्ही बाजूने पैसे घ्यायचो. आपण असं करु असं तिने अमृताला सांगितले. मात्र अमृताने त्याकडे दृर्लक्ष केलं.
अडकवण्यासाठी ट्रॅप रचला
माझ्या वडिलांना सोडवा मग मी एक कोटी रुपये देईन अशी ऑफर तिने केली. त्यानंतर वारंवार बुकीजचा विषय निघाला त्यावेळी माझ्या पत्नीने तिचा फोन नंबर ब्लॉक केला. हा प्रकार मला समजल्यानंतर आधी एफआयआर दाखल केला. त्यानंतर काही दिवसांनी एका अनोळखी क्रमांकावरुन काही व्हिडिओ क्लिप्स आल्या. त्या उघडून पाहिल्या त्यात एक गंभीर व्हिडिओ म्हणजे ती मुलगी बाहेर कुठेतरी एका बॅगेत पैसे भरतेय. तशीच दुसरी बॅग भरुन आमच्या बंगल्यावर काम करणाऱ्या महिलेला देतेय. या सर्व गोष्टींची फॉरेन्सिककडून तपासणी करण्यात आली. दोन्ही बॅगेचा व्हिडिओ आणि एक पैसे तर दुसऱ्यात कपडे होते. तिने अडकवण्यासाठी ट्रॅप रचला होता, असंही फडणवीस यांनी सांगितलं. एका व्यक्तीने धमकी दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल. माझे सगळ्या पक्षाशी संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला तात्काळ मदत करा. आमच्या सगळ्या केसेस क्लिअर करा, असे अमृता यांना सांगण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
या प्रकारानंतर लगेच आम्ही पोलिसांना सांगितले. त्याचा एफआयआर करुन घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
त्या सगळ्या व्हिडिओची तपासणी करण्यात आली. यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आल्याचे
फडणवीसांनी सांगितलं. त्यानंतर त्या मुलीने सर्व गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं मी केल्याचे सांगितले.
बोलता बोलता त्या मुलीने काही नेत्यांची नावे, काही पोलिसांची नावे घेतली.
आम्हाला हे सगळ करायला सांगण्यात आल्याची हिंट तिने दिली होती.
त्या मुलीने दिलेल्या हिंटप्रमाणे असे दिसते की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
यापूर्वीही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, असे फडणवीस यांनी सांगितले.
जर तो व्यक्ती पोलिसांच्या हाती आला तर…
काही लोक मला सांगायचे की तुमच्या कुटुंबाला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत आहे.
मात्र ईश्वराची कृपा यासंदर्भातील सगळे पुरावे हाती आले आहेत.
तो व्यक्ती जर पोलिसांच्या हाती आला तर या पाठीमागे कोण आहे हे समजेल.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्या व्यक्तीचे संभाषण असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. त्या व्यक्तीला पोलीस शोधत आहे, तो सापडले,
त्याच्यावर कारवाई होईल. पण राजकारणामध्ये कुठल्या पातळीवर चाललो आहोत, त्याचा विचार आपल्याला
करावा लागेल असेही फडणवीस म्हणाले.
Web Title :- Amruta Fadnavis Bribery Case | devendra fadnavis told the incident related to amrita fadnavis bribery case in the legislative assembly
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Siddharth Shirole | 23 गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे
Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती