Amruta Fadnavis Bribery Case | ‘जयसिंघानी यांना मातोश्रीवर कोणी आणलं ते कोणत्या जिल्ह्यातील हे सर्वांना माहित’- आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis Bribery Case | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी महिला अनिक्षा जयसिंघानीला (Aniksha Jayasinghani) अटक केली. त्यानंतर आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला (Anil Jaisinghani) गुजरातमधून अटक केली. यावरुन महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. (Amruta Fadnavis Bribery Case)

 

जयसिंघानी याला अटक केल्यानंतर भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी अनिल जयसिंघानी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, अनिल जयसिंघानी मातोश्रीवर आले होते हे आपण पाहिलं आहे. जयसिंघांनी यांना मातोश्रीवर कोणी आणलं होतं हे सर्वांना माहिती आहे. ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत बघा. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे कोणाकडे निर्देश केले, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

कोण आहे अनिल जयसिंघानी?
– उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी
– 2010 मध्ये बेट घेताना पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक
– ब्लू बॉय ऑफ मुंबई ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या जवळचा व्यक्ती
– जवळचा व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police CP) झाल्यानंतर कमिश्नर ऑफिसमध्ये वर्दळ वाढली
– 1995 मध्ये काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर उल्हासनगर महापालिकेची निवडणूक (Ulhasnagar Municipal Election) लढवली
– 1997 मध्ये पुन्हा निवडणुक लढवली मात्र पराभव झाला
– 2002 साली राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश आणि पालिका निवडणुकीत विजयी
– 15 गुन्हे दाखल असून मागील 9 वर्षांपासून फरार

काय आहे प्रकरण?
अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच (Amruta Fadnavis Bribery Case) देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी एफआयआर (FIR) दाखल केला. पोलिसांनी डिझायनर अनिक्षाला ताब्यात घेतले आहे. अनिक्षाने वडिलांना सोडण्यासाठी एक कोटी रुपये लाच देण्याचा तसेच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध आयपीसी 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- Amruta Fadnavis Bribery Case | ‘Everybody knows who brought Jaisinghani to Matoshree in which district’ – Aditya Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Osho Sambodhi Divas | ओशो संबोधी दिनानिमित्त ओशो शिष्यांची संगीत ध्यानधारणा

Pune Metro News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रो एप्रिलपासून गरवारे ते रुबी हॉल धावणार

Pune News | पुण्यात माणुसकीचे दर्शन ! 32 वर्षानंतर घडवून आणली आई आणि मुलांची भेट