‘कोरोना’ आणि ‘पेंग्विन’ महा सरकार हे 2 व्हायरस…’ अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तर कोरोना व्हायरस (coronaviurs) आणि पेंग्विन महासरकार व्हायरस कधी, केव्हा आणि कसे निष्पाप लोकांना आपल्या कचाट्यात घेईल, हे काही सांगता येत नाही, असे ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणाऱ्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समित ठक्कर (sameet thakkar) या तरुणाला शनिवारी अटक केली आहे. या अटकेनंतर आनंद रंगनाथन (anand ranganathan) यांनी ट्विट करत ठाकरे सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘पावरलेस’ मुख्यमंत्री असे समित ठक्कर यांनी उद्धव ठाकरे (chief minister udhav thackry) यांच्याबद्दल ट्विट केले होते. त्यामुळे समितीला अटक केली का ? असा प्रश्न आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत विचारले आहे.

आनंद रंगनाथन यांच्या या ट्विटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महासरकार व्हायरसची उपमाच दिली आहे. कोरोना व्हायरस आणि पेंग्विन महा सरकार व्हायरस हे दोन्हीही कधी, केव्हा आणि कसे निष्पाप लोकांना आपल्या कचाट्यात घेतील हे काही सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित रहा ! गप्प बसा ! असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like