Amruta Fadnavis | ‘मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरते, त्या म्हणजे…’ – अमृता फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मंगळवारी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुलाखत दिली. त्यांची सदर मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांना समाज माध्ममांवर त्रास देणारे त्यांचे विरोधक यांच्यावर आपली भूमिका मांडली. तसेच या मुलाखतीत त्यांनी नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपिता म्हणून गौरव केला. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे फडणवीस (Amruta Fadnavis) यावेळी म्हणाल्या.

माझे स्वत:चे स्वतंत्र विचार आहेत. मी एक स्वतंत्र महिला असून, मला व्यक्त व्हायला आवडते. या व्यक्त होणाच्या सवयीमुळे मला आणि माझ्या पतीला कधी कधी त्रास देखील होतो. आम्हाला तोटा सहन करावा लागतो. मी व्यक्त होण्यास मुळीच घाबरत नाही. मला समाज माध्यमावर त्रास देणारे लोक प्रचंड हुशार आणि चालाख आहेत. त्यांच्याकडे बराच मोकळा वेळ असतो. त्यामुळे ते माध्यमांवर व्यक्त होत असतात. हे लोक म्हणजे महाविकास आघाडीने पाच पैसे देऊन ट्वीटरवर पाठवलेली फौज आहे, असे फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या.

समाज माध्यमांवरील या जल्पकांना मी घाबरत नाही. मी फक्त एका व्यक्तीला घाबरते.
त्या म्हणजे माझ्या सासूबाई. मी माझ्या सासूबाईंना (आई) सोडून कुणालाच घाबरत नाही,
असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर देखील भाष्य केले.

Web Title :- Amruta Fadnavis | dcm devendra fadnavis wife amruta slams trollers say she only fears her mother in law

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Gram Panchayat Result | गुराखी बनला सरपंच, वर्गणी काढून लढवली निवडणूक, भाजपा-काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

Pune Crime | काजूकतली फुकट न दिल्याने गोळीबार; सिंहगड रोडवरील मिठाईच्या दुकानातील घटना