Amruta Fadnavis | संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावरुन अमृता फडणवीसांचा निशाणा; म्हणाल्या – ‘मला मध्यमवर्गीय माणसाची व्याख्या सांगाल का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर कारवाई केली आहे. 8 भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅटसह 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकात आरोपांच्या फैरी झडताना दिसल्या. कारवाईनंतर ‘राज्यात आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय माणसांवर कारवाई केली जाते,’ असं संजय राऊत यांनी म्हटलंं होतं. या विधानानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे.

 

”मी खूप गोंधळलेली आहे – कृपया मला ‘मध्यमवर्गीय माणूस’ च्या व्याख्येसाठी मदत करा  ?? आणि हीच व्याख्या ‘मध्यमवर्गीय राजकारण्याला’ लागू होते का ?” याबाबतचे ट्विट अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलं आहे.

दरम्यान, कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले होते की, ”आपल्याकडे एक रुपयाही मनी लॉन्ड्रिंग केलेला निघाल्यास आपण आपली पूर्ण प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला (BJP) दान करू, असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले होते. दरम्यान, केवळ राजकीय सूडापोटी आपल्यावर ही कारवाई केली जातेय. ही सर्व प्रॉपर्टी आपण कष्टाच्या कमाईतून उभी केली असल्याचे,” संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Amruta Fadnavis | devendra fadnavis wife amruta fadnavis replied to sanjay raut over his statement on middle class man

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा