Coronavirus : ‘कोरोना’ योद्धांसाठी अमृता फडणवीस यांचं ‘तू मंदिर तू शिवाला’ गाणं

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी मेहनत करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या माध्यमातून या योद्धांचे आभार मानले आहेत. ‘तू मंदिर, तू शिवाला’ गाणे गात त्यांनी योद्धांना वंदन केले आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत लोकांमध्ये लढण्यासाठी प्रेरणा यावी हा त्यांचा यामागे उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अमृता  यांची गाणी नेहमीच रसिकांचे लक्ष वेधून घेत असतात. आशिष मोरे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणार्‍या योद्धांसाठी हे गाणे समर्पित केले आहे. याआधी सलमान खान, अजय देवगण या सेलिब्रिटींनीसुद्धा कोरोनावर गाणी प्रदर्शित केली आहेत. कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला.  लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला असला, तरी केंद्राने त्यापूर्वीच देशभरात ठिकठिकाणी अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासंदर्भातील निर्णयाला परवानगी दिली आहे.