Amruta Fadnavis | शिंदे यांचे नेतृत्व आधीपासून मिळायला हवं होतं, शिंदेच खरे शिवसेनेचे उत्तरदायित्व – अमृता फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंड (Rebellion in Shiv Sena) करुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे यांचा प्रयोग महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Govt) पूर्वी व्हायला हवा होता का असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना पुण्यातील एका कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, कुटुंबवाद जर बाजूला ठेवला तर शिंदेच खरे शिवसेनेचे उत्तरदायित्व आहेत, तसेच ते खरी शिवसेना पुढे नेण्याचे काम करत असल्याचे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी म्हटले.

 

पुण्यातील वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील अनाथ मुला मुलीसोबत थेट संवदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले. मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भगवा फडकेल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, शिवसेनेच्या पहिल्या गटाचे राज्य हे 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर राहीले. एवढे वर्ष राज्य असूनही आपल्या नद्या, समुद्र, रस्ते, वाहतूक आणि विकास झालेला नाही. ज्या प्रमाणे विकास व्हायला हवा होता त्याप्रमाणे झाला नाही. आणि आता बदल होणे गरजेचे आहे. आणि याच बदलामुळे मुंबईच्या लोकांना चांगले आयुष्य मिळणार आहे. मुंबईत बदल गरजेचा आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी बाबत अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र गॉगल मास्क घालून कुणाला भेटायला जायचे हे माहित नाही. मी असं नाही म्हटलं की ते एकनाथ शिंदे यांना भेटायला जात होते. मी असं म्हटलं की ते गॉगल मास्क घालून कोणाला तरी भेटायला जात होते. अजित पवार, एकनाथ शिंदे की अशोक चव्हाण (Ashok Chavan) ते त्यांनाच माहिती होते.

पहाटेच्या शपथविधीबद्दल मला एवढे माहीत आहे, की तो गनिमी कावा होता.
पुढे काही आतल्या गोष्टी असेल तर ते त्यांना माहीत असेल. त्यांची पुस्तके येणार आहेत.
ते येतील तेंव्हा वाचू. ज्यांची पुस्तके येणार आहेत त्यात कळेल देवेंद्र फडणवीस,
अजित पवार यांच्या जीवनात खूप काही लिहिण्यासारखे आहे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

 

Web Title :- Amruta Fadnavis | if familyism is kept aside shinde is the real responsibility of shiv sena amruta fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Congress | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या भीतीने सोनिया गांधी बॅकफूटवर, मोठा निर्णय बदलला

 

NPS Tier 1 Vs Tier 2 | मिळवायची असेल जादा Tax सवलत, एनपीएस खाते उघडताना निवडा ‘हा’ पर्याय

 

Aditya Thackeray | ‘गद्दारांना काय मिळालं ‘बाबाजी का ठुल्लू’, आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना टोला (व्हिडिओ)