Amruta Fadnavis | ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून होणाऱ्या वादाबद्दल अमृता फडणवीसांनी मांडले आपले मत; म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाईन : Amruta Fadnavis | बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीचा वाद चर्चेत राहिला. त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, गायिका आणि बँकर अश्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस या सध्या चर्चेत आहेत. अमृता फडणवीस या त्यांच्या नवीन गाण्यामुळे सध्या चर्चेत आहेत. ‘आज में मूड बना लिया’ हे अमृता यांचं नवं गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या निमित्ताने त्यांनी एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या कि, “कोणतेही गाणं करतेवेळी संस्कृतीची काळजी घ्यायला हवी. गाण्यातून कोणताही संस्कृतीचा अपमान होता काम नये. तसंच मला वाटतं की गाण्याला कोणताही धर्म, भाषा नसते. ते वेगळं असतं. आपण गाण्याला एक कला म्हणूनच पाहायला हवं. त्यामुळे होणारे वादविवाद टाळता येतील आणि विनाकारण होणारे तंटे होणार नाहीत.
गाणे, कला, संस्कृती या गोष्टी धर्म आणि भाषेच्या पलीकडच्या आहेत त्याकडे आपण तसेच तटस्थ
पद्धतीने पाहायला हवं. तसेच जे यांची निर्मिती करत आहेत, त्यांनीहि यातून कोणाच्याही धार्मिक भावना
दुखावल्या जाणार नाही, याबद्दल काळजी घ्यायला हवी. याबद्दल दोन्हीही बाजूने समतोल राखला गेला पाहिजे”,
तरच समाजात शांतता पसरेल असे अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) म्हटले.
दरम्यान अमृता फडणवीस यांची काही गाणी याआधीही प्रदर्शित झाली आहेत.
त्यांच्या या गाण्यांना सोशल मीडियावरही बराच प्रतिसाद मिळाला.
वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
Web Title :- Amruta Fadnavis | maharashtra deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis talk about controversial songs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supriya Sule | ‘माझ्या भोळेपणाचा ‘त्या’ नेत्याने फायदा घेतला, मला उल्लू बनवलं!’ – सुप्रिया सुळे