Amruta Fadnavis | महाशिवरात्रीनिमित्त अमृता फडणवीसांनी शेअर केला त्यांच्या गाण्याचा जुना व्हिडिओ; सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन : Amruta Fadnavis | गायिका अमृता फडवणीस यांच्या ‘अज मैं मूड बणा लेया वे…’ या पंजाबी गाण्यामुळे चर्चेत होती. पुन्हा एकदा महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. अमृता केवळ उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी म्हणूनच नाही तर त्याच्या गाण्यांमुळे देखील ओळखल्या जातात. अमृताचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात. (Amruta Fadnavis)

अमृता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांच्या गाण्याच्या प्रमोशन त्याचबरोबर विविध राजकीय सामाजिक विषयांवर नेहमीच भाष्य करत असतात. तर आज त्यांनी महाशिवरात्रीनिमित्त त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या ट्विटर आणि त्यांच्या फेसबुकवर शेअर केला असून सध्या त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. यावेळी त्यांनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करत अमृता यांनी या गाण्याची युट्युब लिंक ही सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Amruta Fadnavis)

गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला हा व्हिडिओ ‘शिव तांडव स्तोत्रम’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आले होते. त्यावेळी या व्हिडिओला 13 मिलियन हून अधिक व्ह्यूज मिळाले होते. आज पुन्हा अमृता यांनी तोच व्हिडिओ शेअर करत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्याने या व्हिडिओच्या व्ह्यूज मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या व्हिडिओचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून संगीत दिग्दर्शन शैलेश दानी यांनी केले आहे. तर अमृताच्या चाहत्यांनी या गाण्याला भरभरून प्रेम दिले आहे. या गाण्यांमधील अमृताच्या लूकने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्ष माळ आणि कुरळ्या केसांच्या स्टाईलची निवड यावेळी अमृताने केली आहे. तर आजवर अमृताच्या ‘शिवतांडव स्तोत्रम’, ‘अज मैं मूड बणा लेया वे..’, ‘तेरी बन जाऊंगी’, ‘कुणी म्हणाले’, ‘बेटियाँ’ या गाण्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली आहे.

Web Title :- Amruta Fadnavis | mahashivratri 2023 amruta fadnavis reshared her old video of shiv tandav stotram

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakhi Sawant | गरोदर असल्याच्या चर्चांवर राखी सावंतने सोडले मौन ; आदिल खानवर केले गंभीर आरोप

Sanjay Leela Bhansali | ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर भन्साळींची ‘हीरामंडी’ वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ अभिनेत्रीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Priyadarshini Indalkar | शाहिद कपूरच्या ‘फर्जी’मध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ‘ही’ अभिनेत्री साकारणार महत्त्वाची भूमिका; व्हिडिओ व्हायरल