Amruta Fadnavis On Ajit Pawar | राजकारणी खूप ठिकाणी डोळे मारतात, अमृता फडणवीस यांचा अजित पवारांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis On Ajit Pawar | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) हे चर्चेत आहेत. ते भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा रंगली होती. यानंतर त्यांनी खुलासा करत चर्चांना पूर्णविराम दिला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणी लोक खूप ठिकाणी डोळे मारत (Blinks) असतात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खरोखरच कितपत मैत्री आहे? या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावला. (Amruta Fadnavis On Ajit Pawar)

 

अजित पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना रोखठोक भाष्य केलं होतं. त्यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, मला कोणीही राज्याचा मुख्यमंत्री झालेला आवडेल. पण जो कोणी असेल त्याने झोकून देऊन काम केले पाहिजे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मैत्रीविषयी विचारले असता अमृता फडणवीस म्हणाल्या, राजकीय नेत्यांची एकमेकांची खूप जवळीक असते. त्यामुळे ते खूप ठिकाणी डोळे मारतात. पण मला माहिती नाही कि कोण कुठे कुठे डोळा मारत आहे. त्या दोघांमध्ये किती मैत्री आहे हे त्या दोघांनाच माहिती असं देखील त्या म्हणाल्या.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे विधान मुलाखतीत केलं होत.
यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मुख्यमंत्री कोणी झाले तरी मला चालेल, फक्त त्यांनी योग्य काम करायला पाहिजे.
जी व्यक्ती चोवीस तास महाराष्ट्रासाठी (Chief Minister of Maharashtra) झोकून काम करेल त्याच्यामागे मी उभी राहीन.
मात्र जनतेला जो माणूस आणि पक्ष योग्य वाटेल, ते न्याय देऊ शकतील असे वाटेल त्यांनी सत्तेत यावे.
तेच आपल्या महाराष्ट्रासाठी चांगले आहे. तो कुणीही असो. प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की,
तो फक्त प्रगतीसाठीच काम करणारा आहे. स्वत:च्या घरासाठी काम करणारा नाही, असेही अमृता फडणवीस शेवटी म्हणाल्या.

 

Web Title :- Amruta Fadnavis On Ajit Pawar | maharashtra politics devendra fadnavis wife amruta fadnavis taunts ncp leader ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dagdusheth Ganpati | दगडूशेठ गणपती : श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम् विवाह सोहळा थाटात

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन