Amruta Fadnavis On Thackeray Government | ‘उध्वस्तने कुठं नेऊन ठेवलाया महाराष्ट्र आमचा?’; अमृता फडणवीसांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis On Thackeray Government | राज्यात भोंग्यांवरून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतलेल्या राणा दाम्पत्याला (Navneet Rana & Ravi Rana) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) झालेला हल्ला यावरून राज्यातील वातावरण तापलेलं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यामध्ये आता उडी घेतली असून त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (Amruta Fadnavis On Thackeray Government)

 

उध्वस्त ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा? असा सवाल करत अमृता फडणवीस यांनी खाली पर्याय दिले आहेत त्यामध्ये, वसूलीच्या ताब्यात, विकृत अघाडीच्या ताब्यात, लोड sheddingच्या ताब्यात, (Traffic Jam) आणि अव्यवस्थेच्या ताब्यात, गुंडांच्या ताब्यात असे पर्याय आहेत.

 

 

दुसऱ्या ट्विटमध्ये, बाळासाहेबांच्या नावावर इथे सर्वजण करतात रासलीला आणि मी काही करायला, बोलायला गेले तर लगेच कॅरेक्टर ढीला, असंही अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

 

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या या ट्विटने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis On Thackeray Government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा