मिसेस CM अमृता फडणवीस यांचा ‘तेरी बन जाऊंगी’मध्ये ‘ग्लॅमरस’ अंदाज (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे गाण्यावर असलेले प्रेम सर्वांनाच माहित आहे. आता याच मुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीग – बी अमिताभ बच्चन यांच्या बरोबर एक गाणे गायल्यानंतर आता त्या आपला आणखी एक अल्बम घेऊन पुढे येत आहेत. तेरी बन जाऊंगी असे या गाण्याचे नाव असून टी सीरीजने त्या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या गाण्याचा व्हिडिओत अमृता फडणवीस या ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत.

हा टीझर यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर या टीझरला ५० हजारांपेक्षा आधिक व्ह्यूज मिळाले आहेत. टीझर नंतर हे गाणे आता ५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

गाणं गाणाऱ्या अमृता फडणवीस अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांच्या डान्स करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीला देखील उतरला होता. एका लग्नसमारंभात त्या बाजीराव मस्तानी सिनेमातील गाणे ‘मै दिवानी, मै मस्तानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसल्या होत्या. अमृता फडणवीस यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त