मिटींगमध्ये कागदावर लिहीलं – ‘फोटो लेते रहो’, माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता झाल्या ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे काही फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत, ज्यामध्ये त्या एका मिटींगमध्ये दिसत आहेत. या दरम्यान त्यांच्या समोरील टेबलवर काही कागद असून, त्यापैकी एकावर लिहिले आहे, ’फोटो लेते रहो’.

खरंतर, अमृता फडणवीस यांच्याच अधिकृत ट्विटर हँडलवरून हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये लिहिले आहे की, त्यांनी ‘Community Health Services 2019-20’ बाबत एका वेबीनार वर्कशॉप/मीटिंगमध्ये भाग घेतला. यादरम्यान टेबलवर पडलेल्या एका कागदारवर लिहिलेले दिसत आहे की, ’फोटो लेते रहो’. यानंतर हे फोटो मोठ्याप्रमाणात वायरल झाले आणि सोशल मीडियावर यूजर्सने भरपूर मजा घेण्यास सुरूवात केली.

एका यूजरने लिहिले की, किमान फोटो पोस्ट करण्यापूर्वी क्रॉप तरी करायचा होता. आश्चर्य म्हणजे, हे फोटो अमृता फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आले आहेत. सईद आलम नावाच्या यूजरने लिहिले आहे की, तस्वीर देखो- तस्वीर लेते रहो. या फोटोला लोक मोठ्याप्रमाणात रि-ट्विटसुद्धा करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like