अमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद शहरात प्रियदर्शनी पार्कमध्ये महापालिकेच्या वतीनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1 हजार वृक्षतोड करण्यात येणार असल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार झाला आहे. या आजारातून लवकर बरे व्हा. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. यातून ते कमिशन कमवत असतील.’ तसेच हे ट्विट करताना त्यांनी वृक्षतोड करण्यात येणार असल्याची बातमी शेयर केली आहे.

यावर औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आम्ही एकही झाड न तोडता हे स्मारक कसं होईल. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे स्पष्टीकरण दिल आहे.

तर अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे की , ‘मॅडम, तुम्हाला निराश केल्याबद्दल क्षमस्व. परंतु सत्य हे आहे की स्मारकासाठी एकही झाड कापले जाणार नाही, हे महापौरांनीही सांगितलं आहे. तसेच, स्पष्टपणे सांगायचे झाले तर सक्तीने खोटे बोलणे हा एक मोठा आजार आहे, यातून लवकर बरे व्हा. ‘

Visit : Policenama.com

 

 

Loading...
You might also like