Amruta Fadnavis | ‘हर मोड़ पर गड्ढे-तालाब..म्हणत अमृता फडणवीसांचा अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | मुंबईत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी पाणी साचलं आहे. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) झाली आहे. शहरात सर्वत्र रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल केला आहे. तसेच, हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा देखील ठप्प झालीय. पावसाचे पाणी साचल्यावरून सारखं राजकारणाला उधाण येत आहे. यंदा सर्वत्र पावसाने धुवाधार करून टाकला आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ट्विटच्या (Amruta Fadnavis Twitter) माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या, ‘या शहरात प्रत्येक वळणावर खड्डे आणि तलाव सापडतील असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. “इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब!” असे त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी प्रशासनावर टीका केली आहे. म्हणजेच, त्यांनी बघितलं तर या शहरात प्रत्येक वळणावर पाणी साचलेले खड्डे दिसतील, पण शोधायला गेलं एकही गुन्हेगार सापडणार नाही असे म्हटले आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी या ट्विटसोबत एक फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोत अमृता फडणवीस रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उभ्या असून त्यांनी जमिनिकडे अंगठा करत प्रशासन अपयशी झाल्याचे सांगितले आहे.

या दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रशासनावर टीका केली होती. त्यांनी एक शेर ट्विट केला होता. ‘ जी तोंडापर्यंत उडत होती, आता पायांना चिकटली आहे. पाऊस पडताच मातीची नियत बदलून गेली,” अशा आशयचा शेर अमृता फडणवीस यांनी ट्विट केला होता. गतवर्षी पहिल्या पावसातचं मुंबई तुंबल्यानंतर त्यांनी मुंबई उपगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीका केली होती.

हे देखील वाचा

Art Director Rajesh Sapte Suicide Case | मौर्या व दुबे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले; पोलिसांची न्यायालयात माहिती

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 283 नवीन रुग्ण, 268 जणांना डिस्चार्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Amruta Fadnavis | water logging in mumbai amrita fadnavis once again targeted shiv sena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update