Amruta Fadnavis | महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? ‘या’ हटक्या शैलीत अमृता फडणवीसांचं उत्तर (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ह्या आज एका कार्यक्रमासाठी पुण्यात (Pune) आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केलं आहे. राज्यातील निर्बंधाबाबत विशेष म्हणजे पुण्यातील निर्बंधाबाबत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये महावसुली न झाल्यास पूरग्रस्तांना मदत पोहोचेल. असा शाब्दिक टोला महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) लगावला आहे. त्यावेळी अमृता फडणवीस ह्या पुण्यात गुरुवारी पत्रकारांशी बोलत होत्या.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी बोलताना म्हणाल्या की, पूरग्रस्तांसाठी दिलेल्या पॅकेजबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन देखील त्यांनी, या पॅकेजमध्ये महावसुली नाही झाली तर बरं, असे म्हणत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अमृता यांच्या या उत्तरानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कोणती गोष्ट अथवा काम तुम्हाला आवडलं? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता. त्यावरही, अमृता फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे, त्यावेळी त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) हे तिन्ही पक्ष एकत्रपणे एकमेकांची पाठ ज्या पद्धतीने खाजवतात ते मला खूप आवडतं, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

पुढे अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे की, एमव्हीए (महाविकास आघाडी) हे सरकार खूप
कमकुवत आहे, ते कधी पडते याचा ध्यास सर्वांना लागलाय. हे सरकार पडल्यास भाजपा चांगला
पर्याय देईल, असं त्यांनी म्हटलं. नंतर तुमच्यासोबत शिवसेना नाही, राष्ट्रवादी अथवा काँग्रेस देखील नाही, मग तुम्ही पर्याय कसा देणार? असा प्रश्न अमृता (Amruta Fadnavis) यांना विचारला असता, त्यावर त्यांनी उत्तर दिल की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून, त्यानंतरच तुम्हाला सांगेन, असं भन्नाट उत्तर दिल्याने सर्वांची हशा पिकली.

हे देखील वाचा

Driving Licence | सरकारचा मोठा निर्णय ! ड्रायव्हिंग लायसन्सचे बदलले नियम, आता एनजीओ आणि खाजगी कंपन्यासुद्धा जारी करू शकतील DL

Airbags | सरकारचा नवीन प्रस्ताव ! कारमध्ये किमान 6 एयरबॅग असाव्यात, परिणाम – किंमत 30 ते 50 हजाराने वाढणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Amruta Fadnavis | what your favorite thing about mva government amrita fadnaviss abandoned answer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update