मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीसांना ‘त्या’ सर्वांनी ‘मराठी’वरून घेतलं ‘फैला’वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेत्यांच्या वक्तव्यावरून त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जाते. नेत्यांना ट्रोल करण्याची एकही संधी नेटकरी सोडत नाहीत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. नेहमी गाण्यामुळे चर्चेत असणाऱ्या मीसेस मुख्यमंत्री सध्या आपल्या अशुद्ध मराठीमुळे नेटेकऱ्यांकडून ट्रोल होत आहेत.

अशुद्ध मराठी ट्विटवरून ! अशुद्ध मराठीत ट्विट केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अमृता फडणवीस यांनी 30 ऑक्टोबर रोजी ट्विट करून दिवाळी मिलन कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये त्यांनी ‘स्थानी’ ऐवजी ‘स्तानी’, ‘मारुन’ ऐवजी ‘मरुन’, ‘आव्हानाचे’ ऐवजी ‘अव्हानाचे’, ‘लक्षात’ एवजी ‘लक्ष्यात’ असे शब्द त्यांनी वापरले होते. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांची थट्टा करत मुख्यमंत्री आणि सरकारचेही वाभाडे काढले आहेत.

दिवाळी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी पत्रकारांसोबत फराळ आणि गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर या कार्यक्रमाची माहिती देणारे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. यामध्ये त्यांनी अशुद्ध मराठी भाषेत कार्यक्रमाची माहिती दिली. यावरूनच त्या आता नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असून त्यांना सल्ले देण्यात येत आहेत.

 

Visit : Policenama.com