home page top 1

मिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी मोदींना फादर ऑफ कंट्री असे म्हणले आहे. अमृता फडणवीस यांनीही मोदींना शुभेच्छा देणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटसह एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आले आहे.

या ट्विटमध्ये समाजाच्या भल्यासाठी सातत्याने प्रेरणा देणारे ‘फादर ऑफ कंट्री’ नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे लिहिले आहे. परंतू त्यानंतर त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त करत टीका केली.

या ट्विटसोबत ‘मिट्टी के सितारे’ या रिअलिटी शोमधील ‘ओ रे मनवा तू तो बावरा है तू ही जाने तू क्या सोचता है’ हे गाणे असलेला एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त अनेक भाजप नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

Loading...
You might also like