अमृता फडणवीसांनी गृहमंत्री अमित शहांना दिली आधुनिक भारताचे ‘चाणक्य’ ही उपमा !

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस ( Union Home Minister Amit Shah today His Birthday) असून त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा (wishes) वर्षाव होत आहे. भाजपच्या नेत्यांनी सकाळपासून सोशल मीडियावर शहांचे अभिष्टचिंतन सुरू केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis) यांनी देखील शहा यांचा (Amit Shah) गुणगौरव करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘आधुनिक भारताचे चाणक्य’ असं त्यांच वर्णन केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी शहा यांच्या सोबतचा एक कौटुंबिक फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. त्याद्वारे त्यांनी शहा यांचे अभिष्टचिंतन केलं आहे. काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काही दिवसांपूर्वी अमृता यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोदींना ‘भारताचे पितामह’ असं म्हटलं होतं. त्यावरून त्या प्रचंड ट्रोल झाल्या होत्या.

 

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दांत टीका करणाऱ्या पोस्ट त्या टाकतात. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून त्यांनी अनेकदा या सरकारच्या निर्णयांवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही शहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे नेते, प्रेरणास्थान, निर्णयकुशलतेचे नायक केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.